अखिल भारतीय पातळीवरील घर कामगार सर्वेक्षणाचे काम सुरु असून ई-श्रम पोर्टल अंतर्बाह्य बदल घडवून आणेल आणि आकडेवारीवर आधारित धोरणांसाठी नवे मानदंड निश्चित करेल : भूपेंद्र यादव

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज चंडीगडच्या कामगार मंडळाने सुरु केलेल्या देशातील पहिल्या अखिल भारतीय पातळीवरील घर कामगारांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करून दिली. अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण कामगारांमध्ये घर कामगारांचा लक्षणीय वाटा आहे. मात्र, या कामगारांच्या संख्येचा आवाका आणि त्यांच्या नोकऱ्यांची सध्याची परिस्थिती याबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. म्हणूनच, घरकाम करणाऱ्या […]

Continue Reading

वीरांगना: महिलांचे रक्षण करणा-या महिलांच्या शौर्य, पराक्रम आणि धैर्याची कथा

‘‘वीरांगना याचा अर्थ आहे अतिशय शूर, पराक्रमी महिला. अशी महिला आपल्या हक्कांसाठी समोरच्या व्यक्तीबरोबर मोठ्या धैर्याने लढा देते. एक कणखर, सशक्त महिला केवळ आपल्या स्वतःचे रक्षण करतात असे नाही तर, इतरांचेही रक्षण करतात’’, असे मत ‘वीरांगना’ या आसामी माहितीपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते किशोर कलिता यांनी आज व्यक्त केले. गोव्यात 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच […]

Continue Reading

भारतातील सहजसुंदर सहअस्तित्व ओटीटी आणि बिग स्क्रीन यांच्यातही पाहायला मिळेल : अपर्णा पुरोहित

“मी कधीच व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ करण्याचा प्रयत्न करत नाही. मी नेहमीच वास्तवात जगण्याचा आणि व्यक्तिरेखा जनतेतली  प्रतिनिधी वाटेल, याप्रकारे साकारण्याचा  प्रयत्न करतो. गोव्यात 52 व्या इफ्फी दरम्यान आयोजित ‘क्रिएटिंग कल्ट आयकॉन्स: इंडियाज ओन जेम्स बॉण्ड’ स्वतःचे जेम्स बाँड विथ द फॅमिली मॅन’ या विषयावरील संवाद  सत्रात’ प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी आपल्या मनोगतात हे […]

Continue Reading

कोविड – 19 अद्ययावत माहिती

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 116.87 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.31 टक्के आहे; मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 12,510 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,39,34,547 गेल्या 24 तासामध्ये 8,488 नव्या रूग्णांची नोंद, गेल्या 538 दिवसातील सर्वात कमी […]

Continue Reading

राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 21.64 कोटी पेक्षा जास्त मात्रा उपलब्ध

कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्रसरकार कटीबद्ध आहे. देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून सुरु झाले. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे […]

Continue Reading

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8,488 नवे रुग्ण

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  32,99,337 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 116.87 कोटीपेक्षा जास्त  (1,16,87,28,385) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,20,77,324 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये यांचा समावेश आहे- HCWs 1st Dose 1,03,82,290 2nd Dose 94,07,092   FLWs 1st Dose 1,83,76,108 2nd Dose 1,63,19,085 […]

Continue Reading

कोविड-19 विरोधात लसीकरण हे प्रभावी अस्त्र; लसीकरणाचा वेग आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेऊया- डॉ मनसुख मांडविय

कोविड-19 लसीकरणाच्या अखेरच्या टप्यात आपण आलो असून लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवत संपूर्ण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेऊ या असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मणिपूर, मेघालय, नागालॅन्ड आणि पुद्दुचेरी इथल्या आरोग्य सचिव आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी   त्यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी […]

Continue Reading

13 परम विशिष्ट सेवा पदके, 2 उत्तम युध्द सेवा पदके आणि 24 अति विशिष्ट सेवा पदके प्रदान

तिन्ही संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज 22 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या संरक्षण क्षेत्राच्या औपचारिक पुरस्कार समारंभाच्या पहिल्या टप्प्यात सशस्त्र दले आणि निमलष्करी दलांतील जवानांना विविध पुरस्कार प्रदान केले. यामध्ये एका मरणोत्तर कीर्ती चक्रासह एकूण दोन कीर्ती चक्रे, एक वीर चक्र आणि 10 शौर्य चक्र या […]

Continue Reading

गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या बनावट वस्तूंची विक्री रोखण्यासाठी प्राधिकरणाची देशव्यापी मोहीम

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’- या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या बनावट वस्तूंची विक्री रोखण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. या संदर्भात, प्राधिकरणाने आधीच देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना अशा वस्तूंच्या उत्पादन किंवा विक्रीशी संबंधित अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांच्या उल्लंघनाबाबत तपास  करण्याचे निर्देश […]

Continue Reading

राष्ट्रपतींनी 2020 या वर्षासाठीची शौर्य पदके केली प्रदान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी (22 नोव्हेंबर 2021) ला राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण विषयक पदके प्रदान करण्याच्या समारंभ –I मध्ये शौर्य पदके आणि विशिष्ट सेवा पदके प्रदान केली. 2020 या वर्षासाठीच्या पुरस्कारांचा हा पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्याअंतर्गत, संरक्षण विषयक पदके प्रदान करण्याचा समारंभ – II आज संध्याकाळी होणार आहे. पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी […]

Continue Reading