राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्याकडे न वापरलेल्या 22 कोटी 83 लाखांहून अधिक मात्रा अजूनही शिल्लक आणि पुढील काळातील वापरासाठी उपलब्ध

संपूर्ण देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढविणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 रोजी सुरु करण्यात आली. या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसीच्या अधिक मात्रा उपलब्ध करून देणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे […]

Continue Reading

गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 82 लाख 86 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासाच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 82,86,058 मात्रा देण्यात आल्या असून त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 121 कोटी 94 लाखांचा (1,21,94,71,134) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,26,30,392 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या […]

Continue Reading

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय साजरा करणार ‘स्वातंत्र्याचा डिजिटल अमृतमहोत्सव ; 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या विशेष सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

देश सध्या, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आणि हा भारतासाठी अमृतकाळ आहे. तसेच, भारताला आपले सामर्थ्य समजून घेत, इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येण्याचीही हीच योग्य वेळ आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  आत्मनिर्भर भारत अभियानाविषयीचे आपले दूरदर्शी धोरण आणि त्यातून नव्या भारताची उभारणी यावर सातत्याने मार्गदर्शन करत असतात. या अनुषंगाने, […]

Continue Reading

इंडिया@75 बीआरओ मोटरसायकल मोहिमेने 10,000 किमी केले पूर्ण

ठळक मुद्दे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र उभारणी आणि रस्ते  सुरक्षा जागृतीचा संदेश देण्यासाठी देशाच्या चारही दिशांच्या प्रदेशात प्रवास करत इंडिया@75 बीआरओ मोटरसायकल मोहीम स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 14 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीत या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. कोलकाता येथे 27 नोव्हेंबर 2021 रोजी पोहोचून मोहिमेने चौथा टप्पा पूर्ण केला. न थांबता […]

Continue Reading

भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह फोकस्ड ऑपरेशन यांचे आयोजन

भारत, मालदीव आणि श्रीलंका या तीनही देशांतील आघाडीच्या सागरी सुरक्षा संस्थांची पहिले’कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्ह (सीएससी) फोकस्ड ऑपरेशन  दिनांक 28 आणि 29 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात आयोजित करण्यात आले आहे. यात भारतीय नौदल (आय एन,IN) मालदीव राष्ट्रीय सुरक्षा दल,(एमएनडीएफ, MNDF) आणि श्रीलंका नौदल (SLN)या देशातील लढाऊ नौका आणि विमाने सहभागी होणार असून या तीनही देशांच्या दक्षिण […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला […]

Continue Reading

ग्रामीण पर्यटनाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधानांच्या सन्मानार्थ काँगथॉन्गच्या लोकांनी रचलेल्या विशेष धूनबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता

गावाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून चालना देण्यासाठी  भारत सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी काँगथॉन्गच्या लोकांनी रचलेल्या विशेष धूनबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत. मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “या सन्मानाप्रीत्यर्थ काँगथॉन्गच्या लोकांचा आभारी आहे. मेघालयच्या पर्यटन क्षमतेला चालना देण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि हो, राज्यात […]

Continue Reading

पश्चिम बंगालातील नादियामध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक

पश्चिम बंगालमध्ये नादिया येथील रस्ते अपघातात झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की ” पश्चिम बंगाल मध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल अत्यंत दुःख होत आहे. अपघातात सापडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे ‌. अपघातातील जखमींना लवकर आराम पडो हीच प्रार्थना” Extremely pained by the loss of lives due […]

Continue Reading

पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये नादिया येथील अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून केली मदत मंजूर

पश्चिम बंगालमध्ये नादिया येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. “पश्चिम बंगालमध्ये नादिया येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत पंतप्रधानांकडून मंजूर झाली […]

Continue Reading

पतंजली विद्यापीठाच्या प्रथम पदवीदान समारंभास राष्ट्रपतींची उपस्थिती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज  28 नोव्हेंबर 2021 रोजी हरीद्वार येथील पतंजली विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला उपस्थिती लावली आणि संबोधित केले. स्वामी रामदेव यांनी योग लोकप्रिय करण्याकरता मोठे योगदान दिले असे उद्गार यावेळी संबोधित करताना राष्ट्रपतींनी काढले. स्वामी रामदेव यांनी अगणित सामान्य जनांना योगाभ्यासाशी जोडून त्यांचा लाभ करून दिल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. योग हा एखाद्या […]

Continue Reading