पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशांमधे पंतप्रधान म्हणाले;
“उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त देवभूमीतील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांत राज्याने केलेल्या प्रगती बघता, हे संपूर्ण दशक उत्तराखंडचेच असेल अशी मला खात्री आहे”
“उत्तराखंडमध्ये झालेली विकासकामे याचा पुरावा आहे की आता पर्वतांचे पाणी आणि तरुणाई या दोन्हींचा वापर येथे होत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे राज्य विकासाच्या वाटेवर निरंतर अग्रेसर रहावे हीच सदिच्छा.”
उत्तराखंड के स्थापना दिवस पर देवभूमि के अपने सभी भाइयों और बहनों को मेरी हार्दिक शुभकामनाएं। पिछले पांच वर्षों में प्रदेश ने जो प्रगति की है, उससे मुझे विश्वास है कि यह पूरा दशक उत्तराखंड का ही होने वाला है।
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2021