साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.26 %) गेल्या 45 दिवसांपासून 2% पेक्षा कमी

दैनिक समाचार

भारतात गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या  23,84,096   मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण  108.47  कोटीपेक्षा अधिक ( 1,08,47,23,042) मात्रा दिल्या आहेत. एकूण  1,09,98,126   सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्याआकडेवारीनुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे-

HCWs1st Dose1,03,79,606
2nd Dose92,69,660
  FLWs1st Dose1,83,72,723
2nd Dose1,60,37,946
  Age Group 18-44 years1st Dose42,45,43,385
2nd Dose15,14,76,624
  Age Group 45-59 years1st Dose17,63,88,452
2nd Dose9,93,34,705
  Over 60 years1st Dose11,06,32,907
2nd Dose6,82,87,034
Total1,08,47,23,042

गेल्या 24 तासात 13,204 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,37,63,104   रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

परिणामी, कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.24% झाला आहे.

सलग  134  दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 गेल्या 24 तासात  11,451   नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या देशातील सक्रीय रुग्णसंख्या  1,42,826   इतकी असून ही संख्या गेल्या  262  दिवसातली सर्वात कमी आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण उपचाराधीन रुग्णांच्या 0.42% इतकी असून मार्च 2020 पासून ही   सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

देशात गेल्या 24 तासात  8,70,058 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण  61.60    कोटीहून अधिक ( 61,60,71,949  ) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या  1.26% असून, गेले  45   दिवस हा दर सातत्याने 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर  1.32%   असून गेले  35   दिवस 2% पेक्षा कमी आणि  सलग 70   दिवस 3% पेक्षा कमी आहे.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *