देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 108.47 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 11,451 नवे रुग्ण आढळले.
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.24%. गेल्या मार्च 2020पासून सर्वोच्च स्तरावर
गेल्या 24 तासांत 13,204 रुग्ण कोविडमुक्त; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,37,63,104
देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.42 %; मार्च 2020पासूनचे सर्वात कमी प्रमाण
देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,42,826; गेल्या 262 दिवसांतील सर्वात कमी
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर ( (1.32% ) गेल्या 35 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ( 1.26% ) गेल्या 45 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 61.60 कोटी चाचण्या करण्यात आल्या.