पोलंडमध्ये झालेल्या आयएसएसएफ प्रेसिडेंटस कप स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मनू भाकर, राही सरनोबत, सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचे केले अभिनंदन

दैनिक समाचार

पोलंडमध्ये झालेल्या आयएसएसएफ प्रेसिडेंटस कप  नेमबाजी स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर, राही सरनोबत, सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“पोलंडमधील @ISSF _Shooting प्रेसिडेंटस कप स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल @realmanubhaker, @SarnobatRahi, @SChaudhary2002 आणि @abhishek_70007 यांचे अभिनंदन. भारतीय जनतेला त्यांच्या शानदार कामगिरीचा अभिमान आहे. या खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *