रंगभूमीचे पुनरुज्जीवन करून ती सामाजिक परिवर्तनाचा प्रतिनिधी बनवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

दैनिक समाचार

उपराष्ट्रपती, श्री एम. वेंकैय्या नायडू यांनी आज नाट्यकला, नाटक आणि रंगभूमीचे पुनरुज्जीवन करून चित्रपटांप्रमाणेच लोकप्रिय बनवण्याचे आवाहन केले. रंगमंचावरील नाटके समाजातील घडामोडींचे यथार्थ दर्शन घडवतात, असे निरीक्षण नोंदवून त्यांनी या कलाप्रकाराला जनतेने आश्रय देऊन त्याचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली.

हुंड्यासारख्या सामाजिक दुष्कृत्यांवर सामाजिक जागृती घडवून आणण्यात रंगभूमीने बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेचा संदर्भ देत श्री. नायडू यांनी नमूद केले की समाजातील अनेक भेदभाव करणाऱ्या प्रथा दूर करण्याची क्षमता अजूनही त्यात आहे आणि याचा उपयोग सामाजिक बदलाचा प्रतिनिधी म्हणून केला जाऊ शकतो.

स्वच्छ भारत सारख्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्यात नाटक आणि लोककलाकार मोलाची भूमिका बजावू शकतात, असे निरीक्षण उपराष्ट्रपतींनी नोंदवले.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *