साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.93 %) गेले 57 दिवस 2% पेक्षा कमी

दैनिक समाचार

गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 51,59,931 मात्रा देण्यात आल्या असून भारताने एकूण 115.79 कोटी (1,15,79,69,274) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 1,19,13,371 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

  HCWs1st Dose1,03,82,038
2nd Dose93,89,728
  FLWs1st Dose1,83,75,620
2nd Dose1,62,86,345
  Age Group 18-44 years1st Dose44,03,91,026
2nd Dose18,67,51,559
  Age Group 45-59 years1st Dose18,01,84,542
2nd Dose10,97,56,295
  Over 60 years1st Dose11,28,73,841
2nd Dose7,35,78,280
Total1,15,79,69,274

गेल्या 24 तासात 11,787 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,39,09,708. झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.29% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 146  दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 10,302  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,24,868  आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.36% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,72,863 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 63.05 (63,05,75,279) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.93% असून गेल्या 57  दवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.96% असून गेले 47 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 82 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *