सल्ला देणे फार सोपे असते, लढात उतरून दाखवता आले पाहिजे

दैनिक समाचार
     अलीकडे घरीच बसून लोकांनी असे केले पाहिजे, तसे केले पाहिजे, हे केले पाहिजे ते केले पाहिजे असे आपल्या घराच्या खोप्यात बसून सल्ले देतांना दिसतात,परंतु स्वत:पुढे होऊन लढतांना दिसत नाही. हीच माणसं लढणारयाची खोट दाखवतांना दिसतात परंतु खोट दुरुस्त करतांना दिसत नाही. काल झोपडीत राहणारे मात्र आपल्या माणसांचा लिलाव करुन महालात बसले आहे.सामाजिक जाणीवेचा 'अ' मनता 'ढ' नसमजणारी माणसंच मात्र समाजाच्या समस्या आम्हालाच समजल्या असा आव आणून पोष्ट लिहतात. पण लोकांच्या समस्यासाठी रस्त्यावर उतरायचे म्हटले की हजार बहाने सांगून कृतीतून पळ काढतात. महापुरुषांना पाठांतर करुन पोपटासारखे पोपट पंछी समाजासमोर मिरवतात. पण महापुषाचे विचार आणि त्यांचा त्याग अंगीकारायला सांगीतले की तुम लढो हम कपडे संभालते अशी भुमिका घेतात. आज समाज अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे. अशा अवस्थेत असतांना फक्त बघ्याची भूमिका घेणारे तत्त्वज्ञानी काय कामाचे. फुस्तकाच्या पानाआड व्यथा माडणारे लढ्याचे भाग बणूशकत नसतील तर त्यांचे हे ज्ञान आंधळे आहे. 

कृतीशिवाय तत्त्वज्ञान हे आंधळे असते आणि आणि तत्तज्ञाना शिवाय कृती ही वांझ असते.
आज पुन्हा आपल्यावर लढण्याचे दिवस आले आहे हे जर आपण करुशकलो नाही तर आपला मृत्यु निश्चित आहे.
बस जिंदा रहना है तो लढणा सीखो वरना आपकी कबर तयार है ।

-गीत घोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *