उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, शिक्षक आणि तत्त्वज्ञ श्री कोनेरू रामकृष्ण राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
प्रा.राव यांना ते अनेक दशकांपासून वैयक्तिकरित्या ओळखत होते आणि त्यांच्या निधनाने त्यांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे असे एका शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे.
उपराष्ट्रपती म्हणाले की, प्रा. राव हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू, आंध्र प्रदेश राज्य उच्च शिक्षण आयुक्तालयाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. शिक्षण आणि गांधीविचार क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.
त्यांनी आंध्र विद्यापीठात पॅरासायकॉलॉजी (अतिंद्रीय मानसशास्त्र) विभागाची स्थापना केली असून अनेक पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित केले आहेत असे श्री. नायडू म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी शोकाकुल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
शोकसंदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे –
“अनेक दशकांपासून मला परिचित असणाऱ्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, शिक्षक आणि तत्त्वज्ञ श्री कोनेरू रामकृष्ण राव यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे.”
प्रा. राव हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू, आंध्र राज्य उच्च शिक्षण आयुक्तालयाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. शिक्षण आणि गांधीविचार क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रा. राव यांनी आंध्र विद्यापीठात पॅरासायकॉलॉजी (अतिंद्रीय मानसशास्त्र)
विभागाची स्थापना केली होती आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली होती. ते एक मानसशास्त्रज्ञ आणि पॅरासायकॉलॉजिस्ट देखील होते. त्यांनी अनेक पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित केले होते.
त्यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती!”