राजस्थानमध्ये बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

दैनिक समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर -जोधपूर महामार्गावर बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  (PMNRF) सानुग्रह मदत देखील मंजूर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर संदेशात म्हटले आहे;

“राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात लोकांना आपला जीव गमवावा लागला, हे दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी, मी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.

जखमी व्यक्तींना  लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो : पंतप्रधान @narendramodi

राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान @narendramodi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *