भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 112 कोटी 34 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

दैनिक समाचार

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 30,20,119 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 112 कोटी 34 लाखांचा (1,12,34,30,478) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,15,01,243 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, दिल्या गेलेल्या लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे :

HCWs1st Dose1,03,80,497
2nd Dose93,34,144
  FLWs1st Dose1,83,74,094
2nd Dose1,61,78,125
  Age Group 18-44 years1st Dose43,26,35,344
2nd Dose17,04,47,156
  Age Group 45-59 years1st Dose17,83,12,929
2nd Dose10,49,30,515
  Over 60 years1st Dose11,17,34,885
2nd Dose7,11,02,789
Total1,12,34,30,478

गेल्या 24 तासांत 11,926 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,38,49,785 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.26% आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग 141 दिवस, 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत, 10,229 नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,34,096 इतकी आहे, गेल्या 523 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.39% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम सुरु असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 9,15,198 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 62 कोटी 46 लाखांहून अधिक (62,46,66,542) चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.99% असून गेले 52 दिवस हा दर 2% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.12% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 42 दिवस 2% हून कमी राहिला आहे आणि गेले सलग 77 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *