इफ्फीत बेल्जियम, कोरिया, पोलंड, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमधील क्रीडा आकांक्षांच्या कथांचे होणार सादरीकरण

दैनिक समाचार

गोवा येथे 20 – 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रीडा विभागात खेळावर आधारित चार प्रेरणादायी चित्रपट दाखवले जाणार आहेत.

जागतिक स्तरावर क्रीडा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होत असताना, खेळावर आधारित चित्रपटांनी नेहमीच खरी जिद्द, दृढनिश्चय, सळसळते चैतन्य आणि सौहार्द यांचं चित्रणाने सिनेप्रेमींना आकर्षित केले आहे.  त्याचवेळी, भारताने या वर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदकतालिकेत ऐतिहासिक कामगिरी

नोंदवली असून हे भारतीय खेळांसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे.  पडद्यावर खेळाचे हे वैभव साजरे करण्यासाठी यंदा इफ्फी सिनेप्रेमींसाठी क्रीडाविषयक चार आंतरराष्ट्रीय चित्रपट घेऊन येत आहे.

लिवेन व्हॅन बेलेनचा, रुकी (डच) , जेरो युनचा, फायटर (कोरियन), मॅसीज बार्कझेव्स्कीचा, द चॅम्पियन ऑफ ऑशविट्झ (जर्मन, पोलिश) आणि एली ग्रॅपे यांचा ओल्गा (फ्रेंच, रशियन, युक्रेनियन)  हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

रूकी

मैत्री, शत्रुत्व आणि स्पर्धेची एक साखळी जी तुमच्यातील संप्रेरक उत्तेजित करेल.  लिवेन व्हॅन बेलेनचा रुकी, जीवन आणि दुसरी संधी याविषयीचा डच चित्रपट पहा.  हा चित्रपट निकी या तरुण, महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासपूर्ण मोटरसायकलस्वाराची कथा सांगतो. निकी रेसिंग करताना नेहमीच आपला जीव पणाला लावतो.  खेळाबद्दलच्या त्याच्या साहसी आवडीचे पर्यवसान अखेरीस  अपघातात होते आणि त्याचे जग उद्ध्वस्त होते.  निकी पुन्हा कशी सुरुवात करतो आणि आपल्या पुतण्याला प्रशिक्षण देऊन स्वतःचे स्वप्न कसे पुन्हा जगतो  हे हा चित्रपट दाखवतो.

ब्रुसेल्समधील ब्रुसेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रुकीचा वर्ल्ड प्रीमियर झाला.

फायटर

जेरो युनचा कोरियन चित्रपट, फायटर हा उत्तर कोरियाच्या निर्वासित जिनाबद्दल आहे. ती चांगल्या जीवनाच्या शोधात सेऊलमध्ये येते.  तिला तिच्या वडिलांना दक्षिण कोरियात आणण्यासाठी पैशांची गरज आहे.  पण तिने कितीही मेहनत घेतली तरी दोन कोरियांमधील तणाव आणि त्यानंतर होणारा भेदभाव तिला पैशांची पुरेशी बचत करु देत नाही.  बॉक्सिंग जिमच्या साफसफाईच्या कामामुळे ती बॉक्सिंगच्या जगात येते. तिथेच ती अडखळते.  तरुण आणि आत्मविश्वासू महिला बॉक्सर पाहून जीनाला प्रेरणा मिळते.  पुढे जे घडते ते निश्चितपणे महोत्सवात सहभागी प्रतिनिधींना सर्जनशील प्रेरणा प्रदान करेल.

द चॅम्पियन ऑफ ऑशविट्झ

दुसऱ्या महायुद्धातील खंदकांमधून शोधून काढलेली चिकाटी आणि जगण्याची एक विलक्षण वास्तविक जीवन कथा.  पोलिश दिग्दर्शक मॅसिएज बार्ज़ेव्स्कीच्या चॅम्पियन ऑफ ऑशविट्झ, बॉक्सर आणि छळ छावणीतील ऑशविट्झ-बिर्केनाऊच्या पहिल्या कैद्यांपैकी एक असलेल्या टेड्यूझ ‘टेडी’ पित्र्झाइकोव्स्कीची विस्मरणात गेलेली कथा समोर आणते.  छावणीतील 3 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान ‘टेडी’ नाझी दहशतवादावर विजय मिळवण्याचे आशेचे प्रतीक बनले आहे.  त्याच्या पडद्यावरील इतिहासाचे ऑशविट्झच्या माजी कैद्यांच्या अभिलेखीय विधानांवर आधारित आणि आठवणींच्या आधारे तपशीलवार दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.  त्याचा प्रवास आता सिनेप्रेमींना इफ्फी ५२ मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

ओल्गा

एका तरुण जिम्नॅस्टची चित्तवेधक गाथा, ओल्गा हा दिग्दर्शक एली ग्रॅपेचा बहु-भाषिक चित्रपट आहे.  स्वित्झर्लंडमधे  निर्वासित असलेली ओल्गा, ही एक प्रतिभावान आणि उत्कट युक्रेनियन जिम्नॅस्ट, राष्ट्रीय क्रीडा केंद्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ही तरुण मुलगी नवीन देशाशी जुळवून घेते आणि युरोपियन चॅम्पियनशिपसाठी तयारी करत असतानाच, युक्रेनियन क्रांतीने तिच्या आयुष्यात प्रवेश केला.. आणि सर्वकाही हादरवून टाकले.

खेळ आणि सिनेमाच्या संगमाने प्रेरित होण्यासाठी हे चित्रपट 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहा.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *