ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) 229 वी बैठक, आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली, उपाध्यक्षपदी श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, तर सह-उपाध्यक्ष श्रम आणि रोजगार सचिव सुनील बर्थवाल आणि सदस्य सचिव मुखमीत एस. भाटिया, केंद्रीय पीएफ आयुक्त, ईपीएफओ हे होते.
केंद्रीय मंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले-
- चार उपसमित्या स्थापन करण्याच्या अध्यक्षांच्या सूचनेचे कर्मचारी नियुक्त सभासदांच्या बाजूने मंडळाचे सदस्य तसेच सरकारच्या प्रतिनिधींनी स्वागत केले आणि त्याला मान्यता दिली.
- 2020-21 या वर्षासाठी ईपीएफओच्या कामकाजावरील 68 व्या वार्षिक अहवालाचा मसुदा मंजूर करण्यात आला, तो केंद्र सरकारमार्फत संसदेसमोर ठेवण्याची शिफारस करण्यात आली.
- C-DAC द्वारे केंद्रीकृत आयटी -सक्षम प्रणाली विकसित करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
- केंद्र सरकारने अधिसूचित केल्यानुसार गुंतवणुकीच्या प्रकारात समाविष्ट सर्व मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीसाठी केस-टू-केस आधारावर गुंतवणूक पर्यायांवर निर्णय घेण्यासाठी मंडळाने वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीला (FIAC ) अधिकार देण्याचा निर्णय घेतला.