केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी 23 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या खाण आणि खनिजांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. देशभरातील खाण क्षेत्रातील विविध हितधारक या परिषदेत सहभागी होणार आहेत आणि खाण क्षेत्रातील वाढ आणि व्यवसाय सुलभतेसाठी प्रमुख मुद्यांवर आणि संधींबाबत धोरणात्मक चर्चा करतील.
खाणी आणि खनिजांवरील या 5 व्या राष्ट्रीय परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण विभाग असतील जे उत्खनन, लिलाव व्यवस्था आणि देशातील शाश्वत खाण पद्धतींना प्रोत्साहन देतील. उल्लेखनीय कामगिरीसाठी पंचतारांकित मानांकन असलेल्या खाणींसाठी पुरस्कार वितरण समारंभ हे या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य असेल.