या फेरीत निविदा जिंकणाऱ्या यशस्वी कंपनीला आणखी 15.766 चौरस किलोमीटर क्षेत्रावर संशोधन करता येईल

दैनिक समाचार

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2021

पेट्रोलियम आणि संबंधित उत्पादनांचे संशोधन करण्यासाठीच्या प्रभावी कार्यक्रमाचे सातत्य राखून आणि नेमून दिलेल्या कालमर्यादांचे पालन करून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेसाठी खुल्या एकरी परवाना कार्यक्रमाच्या (OALP) निविदा फेरी-VII ची सुरुवात केली आहे. समर्पित ऑनलाईन ई-निविदा पोर्टलच्या माध्यमातून 15 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत या निविदा सादर करता येतील. या निविदा प्रक्रियेचे निकाल मार्च 2022 पर्यंत हाती येतील अशी अपेक्षा आहे. फेरीतील निविदा जिंकणाऱ्या कंपनीला 15,766 चौरस किलोमीटर क्षेत्रावर संशोधन करता येईल आणि त्यानंतर खुल्या एकरी परवाना कार्यक्रमाच्या अंतर्गत संशोधन होत असलेले एकूण क्षेत्र 2,07,692 चौरस किलोमीटरवर पोहोचेल.

मार्च 2016 मध्ये भारतात हायड्रोकार्बन शोध आणि परवाना धोरणाला (HELP) मंजुरी देण्यात आली. तेल तसेच वायूच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्यासाठी तसेच संशोधन आणि उत्पादन विषयक घडामोडी वेगाने करण्यासाठी केंद्र सरकारने, फेब्रुवारी, 2019 मध्ये संशोधन आणि परवाना या संदर्भातील धोरणात्मक सुधारणा अधिसूचित केल्या. त्यानुसार आता ‘महसुला’वरील भर कमी करून  ‘अधिकाधिक उत्पादन वाढी’वर लक्ष केंद्रित करण्यात आले. या सर्व कार्यवाहीमध्ये अधिक पारदर्शकता आणि  सुव्यवस्थित प्रक्रिया यांच्यावरील भर कायम ठेवण्यात आला.

हायड्रोकार्बन शोध आणि परवाना धोरणाला 30 मार्च 2016 रोजी सुरुवात झाल्यापासून, संशोधन आणि उत्पादन याकरिता 105 ब्लॉक्सची खुल्या एकरी परवाना कार्यक्रमाच्या निविदा प्रक्रिया संपली तर OALP च्या सहाव्या फेरीअंतर्गत 21 ब्लॉक्सच्या वितरणाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या 126 ब्लॉक्समध्ये 18 गाळाच्या खोऱ्यांतील 191,926 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे.

निविदेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि निविदा फेऱ्यांचे तपशील https://online.dghindia.org/oalp या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हायड्रोकार्बन शोध आणि परवाना धोरण हे महसूल सामायिकीकरण करार स्वरूपाचा स्वीकार करुन, भारतीय शोध आणि उत्पादन (E&P) क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यातील सुलभता सुधारण्याच्या दिशेने सरकारने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

गुंतवणूकदारांना स्वारस्य अभिव्यक्ती सादर करण्यासाठी सुरु केलेली बारावी खिडकी सध्या 31 मार्च 2022 पर्यंत खुली राहणार आहे.

संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या ब्लॉक्सचा तपशील (OALP निविदा फेरी-VII)

S. No.NAME Of BLOCKAREA (Sq. Km.)STATE NAMEBASINONLAND/ OFFSHORE
1RJ-ONHP-2021/1486.39RajasthanRajasthanOnland
2AA-ONHP-2021/2382.05TripuraAssam Arakan Fold BeltOnland
3SR-ONHP-2021/1906.43Madhya PradeshSatpura South- Rewa-DamodarOnland
4CB-OSHP-2021/21234.42Western OffshoreCambayOffshore
5CY-UDWHP-2021/18108.69Eastern OffshoreCauveryOffshore
6AS-ONHP-2021/22445.30AssamAssam ShelfOnland
7AS-ONHP-2021/31840.87AssamAssam ShelfOnland
8CB-OSHP-2021/3361.85Western OffshoreCambayOffshore
 Total15766   

* * *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *